भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन ची घोषणा जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. तसेच हातात काम नाही आणि आर्थिक व्यवहारही थांबले आहेत. लोकांसमोर मोठे आर्थिक संकट आले आहे.
या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण विभागाने भाड्याने घरात राहणाऱ्यांसाठी घरभाडे वसूली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी असा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, घरभाडे वसूली तीन महिन्यांनी घ्यावी. तसेच घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्यास कोणालाही घराबाहेर काढू नये अशा सूचना गृहनिर्माण विभागाने महाराष्ट्र राज्यातील घर मालकांना दिल्या आहेत. अशा आशयाचे पत्रक काढण्यात आले आहे.
कोरोनामुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. जनतेला या साथीच्या रोगाचा सामना करावा लागत आहे. तसेच आपल्या राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.