तुर्कस्तानात संकट वाढले
पश्चिम आशियात कोरोना बाधितांप्रकरणी तुर्कस्तानने इराणला मागे टाकले आहे.
तुर्कस्तानात आता 82 हजार 329 रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासांमध्ये
देशात 3 हजार 783 नवे रुग्ण सापडले असून 121 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात
आतापर्यंत 1890 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तुर्कस्तानने देखील
भारताकडून हायड्रॉक्सी क्लोरोक्विन औषध मागविले आहे.