भूगोल – भारतातील खनिज संपत्ती

Shweta K
By -
0

भूगोल – भारतातील खनिज संपत्ती

 
भूगोल – भारतातील खनिज संपत्ती

खनिज संपत्तीच्या बाबतीत भारताची गणना   खनिज संपन्न राष्ट्रात होते .
– सर्व प्रकारची खनिजे भारतात आढळतात.
● बॉक्साइट :- 
- बॉक्साइटचे सर्वात जास्त उत्पादन झारखंड  राज्यात होते.
– झारखंड नंतर छत्तीसगड राज्याचा दुसरा   क्रमांक लागतो .
– महाराष्ट्र, ओरिसा, मध्ये प्रदेश या राज्यातही  बॉक्साइटचे साठे आहेत.
– अल्युमिनियमची निर्मिती बॉक्साइट पासून होते
– बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने विमान व  जहाज बांधणी तसेच सिमेंट व लोहपोलाद
  कारखान्यात होतो.
– महाराष्ट्रात बॉक्साइटचे २९ % साठे  आढळतात.
– महाराष्ट्रात कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,  सांगली, सातारा  इ. ठिकाणी साठे आढळतात.
 
● लोहखनिज :-
 
– भारत हा लोहखनिज निर्यातक देश असून  जगातील २०% साठे भारतात आढळतात.
– लोहखनिज उत्पादनात भारताचा ६ वा क्रमांक  लागतो.
– महाराष्ट्रात लोहखनिजचे साठे सिंधुदुर्ग, भंडारा  चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी आढळतात.
– लोहखनिज प्रामुख्याने टॅकोनाईट व जांभा  खडकात आढळते.
– महाराष्ट्रात २०% उत्पादन होते.
– लोहखनिजचे साठे झारखंड,प.बंगाल,   ओरिसा, महाराष्ट्र, आ. प्रदेश इ. राज्यात  आढळतात .
– लोहाच्या प्रमाणानुसार लोहखनिजचे
    मॅग्नेटाईट(७२%), हेमेटाईट(६०%), सिडेराईट(४८%) व लिमोनाईट (५०%)
  असे चार प्रकार पडतात.
– यापैकी भारतात हेमेटाईट या प्रकारचे साठे  सर्वाधिक आहेत.
 
● दगडी कोळसा :-
 
– दगडी कोळसा उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
– भारतात झारखंड मध्ये सर्वात जास्त साठे  आहेत.
– उत्पादनाच्या बाबतीत चीनचा प्रथम क्रमांक  लागतो.
– कोळशातील कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी  कोळशाचे अँथ्रासाईट(९५% पर्यंत), 
    बिट्येमाईन(८५%-९०%),लिग्नाइट(६५%-७५%), पीट(५०%) पेक्षा  कमी, असे चार प्रकार             पडतात.
– पश्चिम बंगालमध्ये “राणीगंज “ येथे  भारतातील   पहिली दगडी कोळशाची खाण आहे .
– महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येवतमाळ  येथे कोळशाचे साठे आढळतात.
 
● तांबे :-
 
तांबे उत्पादनात झारखंड, राजस्थान व आंध्र  प्रदेश यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा
  क्रमांक लागतो.
– महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर येथे तांब्याचे साठे  आढळतात.
– राजस्थानमधील खेत्री येथे तांब्याचे साठे  आहे.
 
● अभ्रक :-
 
भारत उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर  आहे.
– भारतात अभ्राकाचे उत्पादन झारखंड,   राजस्थान व आंध्र प्रदेश येथे होते.
– महाराष्ट्रात अभ्ररकाचे साठे सिंधुदुर्ग व पूर्व  विदर्भातील काही भागात आढळतात .
 
● मँगनीज :-
 
– मँगनीज उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक  लागतो.
– भारतात ओरिसा, झारखंड, राजस्थान,  महाराष्ट्र, छत्तीसगड येथे प्रमुख साठे आहेत.
– महाराष्ट्रात ४०% साठे सापडतात त्यापैकी  भंडारा , नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे साठे  आहेत.

● चुनखडी :-
 
– चुनखडी उत्पादन मध्ये प्रदेश, महाराष्ट्र,   कर्नाटक , ओरिसा, कर्नाटक येथे प्रमुख
  साठे आढळतात .
– चुनखडीचा उपयोग प्रामुख्याने बांधकामात  केला जातो.
– महाराष्ट्रात चुनखडीचे ९% साठे आढळतात.
– महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली,  धुळे, नंदुरबार रत्नागिरी इ. साठे आहेत.
 
● खनिज तेल  :-
 
– भारत खनिज तेलाचा आयातदार देश आहे.
– खनिज तेल उत्पादनात सौदी अरेबियाचा प्रथम  क्रमांक लागतो.
– खनिज तेल मुख्यतः चुनखडक व वालुकाश्मत  सापडतात.
– भारतातील सर्वात मोठा खनिज तेलाचा  साठा मुंबई हाय येथे आहे.
– भारतातील पहिला तेलसाठा आसाममधील  दिग्बोई.
– भारतात गुजरात, आसाम, राजस्थान,महाराष्ट्र  या राज्यातही खनिज तेल उत्पादन होते.
 

● सोने :-
 
कर्नाटक मधील कोलार येथे भारतातील प्रमुख  सोन्याच्या खाणी आहेत.
– आंध्रप्रदेशात सुद्धा सोन्याच्या खाणी आहेत.
 
● हिरे :-
 
– मध्ये प्रदेशातील पन्ना येथील हिऱ्याच्या खाणी  प्रसिद्ध आहेत.
– उत्तर प्रदेशातील बंदा , मर्झापुर येथेही खाणी  आहेत.
 

● क्रोमाइट  :-
 
– क्रोमाइटचे सर्वात जास्त उत्पादन ओरिसा  राज्यात होते.
– आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटक येथे सापडतात.
– महाराष्ट्रात एकूण १०% साठे सापडतात.
– महाराष्ट्रात भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया व  रत्नागिरी येथे साठे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)