Corona Updates 20-04-2020 -24 तासात कोरोनाच्या 1334 रुग्णांची भर

Shweta K
By -
0

 Corona Updates 20-04-2020 -24 तासात कोरोनाच्या 1334 रुग्णांची भर



देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1334 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 712 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 507 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 27 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 2 हजार 221 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, 20 एप्रिल नंतर हॉटस्पॉट परिसरात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही आहे. 23 राज्यातील 43 जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही आहे.‌ ही दिलासा देणारी बाब आहे. तसेच आत्तपर्यंत 14.19 टक्के लोक बरे झाले आहेत. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशात आत्तापर्यंत 3 लाख 86 हजार चाचण्या घेण्यात आल्या. अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली.

मोठ्या उद्योग क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय तेथेच केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळा. तसेच काही ठिकाणी सूट मिळाल्यामुळे मजुरांना काम मिळेल. मात्र, जिथे सूट दिली जाणार आहे तिथे सावधगिरी पाळावी असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)