जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत - Vitamins and Its Source
सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.
1. जिवनसत्व – अ
शास्त्रीय नांव – रेटीनॉल
उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
2. जीवनसत्व – ब1
शास्त्रीय नांव – थायमिन
उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – बेरीबेरी
स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,
3. जीवनसत्व – ब2
शास्त्रीय नाव – रायबोफ्लेविन
उपयोग – चयापचय क्रियेकरिता
अभावी होणारे आजार – पेलाग्रा
स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
4. जीवनसत्व – ब3
शास्त्रीय नांव – नायसीन
उपयोग – त्वचा व केस
अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
5. जीवनसत्व – ब6
शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन
उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत व पालेभाज्या
6. जीवनसत्व – ब10
शास्त्रीय नाव – फॉलीक
उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत
7. जीवनसत्व – क
शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड
उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
8. जीवनसत्व – ड
शास्त्रीय नाव – कॅल्सिफेरॉल
उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
9. जीवनसत्व – इ
शास्त्रीय नाव – टोकोफेरॉल
उपयोग – योग्य प्रजननासाठी
अभावी होणारे आजार – वांझपणा
स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
10. जीवनसत्व – के
शास्त्रीय नाव – नॅप्थोक्विनान
उपयोग – रक्त गोठण्यास मदत
अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
स्त्रोत – पालेभाज्या व कोबी