पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर -PM KISAN NIDHI

Shweta K
By -
0

 पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर -PM KISAN NIDHI 

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर -PM KISAN NIDHI

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जारी केला आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्यात सरकारने दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत
या योजनेचे ९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सरकारने देशातील ११.३७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.५८ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे. 
पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत तुमचे नाव तपासायचे असेल, तर तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करा. 
       •पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा
•त्यानंतर ‘शेतकरी कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.
•तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
•आता ‘Get Report’ वर क्लिक करा.
•तुमच्या समोर एक लिस्ट ओपन होईल, त्या लिस्टमध्ये तुमच्या खात्याची स्थिती कळेल.
 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)