दिवाळी हा सन फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये हा साजरा केला जातो या दिवशी शाळा , सरकारी कार्यालय, स्कूल ,कॉलेज बँक बंद असतात दीपावली हा फक्त हिंदू नाही तर इतर सुद्धा बरेच लोक सेलिब्रेट करतात दिवाळी हा सण अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवितो
आता दिवाळी हा सण का बरं म्हणल्या जातो कारण या दिवशी भगवान श्रीरामचंद्र यांनी लंकापती रावण याचा वध केला होता आणि त्यांची जी धर्मपत्री सीतामाता तिला लंके होऊन अयोध्याला आणले होते लोकांनी त्यांचे तुपाचे दिवे लावून स्वागत केले होते .
दिवाळी म्हटलं की आपल्या घरी नवीन नवीन पदार्थ बनत असतात जसे की चकल्या लाडू शंकरपाळे रसगुल्ले अनारसे अशा बऱ्याचशा मिठाया आपल्या घरामध्ये बनतात सर्वीकडे आनंद असतो लहान मुलं आपल्या फटाके फोडण्यात व्यस्त असतात असा हा धुमधडाक्याचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण अतिशय उल्हास आनंद आणि सुट्ट्यांचा सण असतो
दिवाळी आली म्हणजे सर्वांना घरामध्ये नवीन कपडे मिळतात . तुम्ही फटाके विकत घेतात नवीन सामान घेतात त्याच पद्धतीने बरेचसे लोक सोन सुद्धा दिवाळीच्या दिवशी विकत घेतात आणि चांदीचे सामान त्याचप्रमाणे आपले जे मित्रपरिवार आहे त्यांना सुद्धा फराळासाठी आपल्या घरी बोलवतात त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी वाढते आणि एकमेकांसोबत आपला संपर्क होतो तर असा हा एक मनमिळावू एक अतिशय असा चांगला सण आपल्या हिंदू धर्मामधील दिवाळी आहे
दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीचा असतो या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करता सगळेजण अभ्यंग स्नान करतात मनोभावे लक्ष्मीची पूजा करता दिवाळीचा
दुसरा दिवस हा नरक चतुर्थी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा या दिवशी वध केला हा तो दिवस अश्विन शुद्ध चतुर्थीला नरक चतुर्दशी साजरी करतात दिवाळीचा
तिसरा दिवस हा अमावस्ये दिवशी व्यापारी लोक मोठ्या थाटामाटात लक्ष्मीपूजन करतात
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजांनी या दिवशी यज्ञ केला होता आणि प्रतिकारशक्ती त्याने प्राप्त केली होती
त्यानंतर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो या दिवशी बहिण भावाला ओवाळते भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देत असतो किंवा काहीतरी भेटवस्तू देत असतो
दिवाळीच्या पूर्वसंख्येला लोक लक्ष्मी माता आणि श्री गणेशाची पूजा करतात . ऐश्वर्या आणि समृद्धीसाठी लक्ष्मीदेवी यांची दिवाळी निमित्त अर्चना केली जाते. दिवाळीच्या सणाच्या दिवशी घरे दुकाने पूर्ण स्वच्छ करतात रंगरंगोटी केली जाते जुन्या वस्तू काढून स्वच्छ करतात तसेच नवीन वस्तू घेतात. घराचे नूतनीकरण करतात आणि घरात स्वच्छता राबवली जाते. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देते अशी जुनी समज आहे सर्व भाविक उत्सवासाठी दिवे फुले रांगोळी मेणबत्त्या हार हे आपलं घर सजवतात
Marathi Mahiti – दिवाळी लक्ष्मि पूजन विधी मुहूर्त पूजा साहित्य यादी
- लक्ष्मी पूजन मुहूर्त: संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 (24 ऑक्टोबर 2022. सोमवार)
- अमृत काल मुहूर्त: सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
- अमृत काल मुहूर्त: सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
दिवाळी लक्ष्मी पूजन साहित्य : laxmi pujan Diwali Puja Yadi list 2022
- १. गणपती फोटो किंवा मूर्ती
- २. लक्ष्मी फोटो किंवा मूर्ती
- ३. कुबेर फोटो किंवा मूर्ती
- ४. गजांत लक्ष्मी
- ५. नाणी किंवा नोटा
- ६. केरसुणी ,( झाडू )
- ७. दागिने , चांदीची नाणी
- ८. कोरी वही त्यावर स्वस्तिक किंवा ओम कुंकुवाने काढावा.
- ९. घंटा , शंका , चौरंग ,किंवा पाट , त्यावर अंथरण्यासाठी लाल रंगाचे कापड, वस्त्र .
- १०. ताम्हण , पळी , सुपारी तांब्याचा तांब्या , निरंजन, दिवा , अगरबत्ती , फुलवात , तेलवात , नारळ , विड्याची पाच पाने.
- ११. समई , हळद, कुंकू , अक्षदा, फुले , आभूट पाणी , तांदूळ , गंध , पंचामृत .
- १२. नैवेद्यासाठी : साळी च्या लाह्या , बत्तासे , गुळ खोबरे , मिठाई , दिवाळीचा फराळ , तसेच पुरणपोळी खीर असेल तर तेही चालेल .
लक्ष्मी पूजन विधी – Laxmi Pujan Vidhi
- सर्व प्रथम एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा नवीन कपडा घालावा.
- चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू आणि फुल वाहावे.
- मग एक चांदी, तांबा किंवा मातीचा तांब्या घेऊन त्यात गंगाजल घ्यावे आणि नारळ ठेवून त्यात विड्याचे पान किंवा आंब्याचे पान ठेवावे.
- लक्ष्मीची मूर्ती स्थापित करतांना कलशच्या डाव्या बाजूला स्थापित करावी आणि मूर्ती स्थापित करण्यापूर्वी अक्षता, हळदी, कुंकू आणि एक नाणे ठेवावे आणि त्यावर मूर्ती स्थापित करावी.
- लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मीची मूर्ती स्थापित केली त्या विधीनुसार गणपतीची मूर्ती स्थापित करावी.
- लक्ष्मी पूजनच्या दिवशी कुबेरची पूजा केली जाते. कुबेरची मूर्ती असल्यास ती ही तुम्ही ठेऊ शकतात.
- आता अन्य वस्तू मूर्ती समोर मांडाव्या, जसे की लाल डायरी, सोने इतर मौल्यवान वस्तू, तसेच बनवलेले नैवेद्य जसे की गोड फराळ आणि इतर नैवेद्य ठेवावे.
- पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे.
- लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यासोबतच माता लक्ष्मीच्या श्री सूक्ताचे पठण करावे.
- या पद्धतीने कुबेर आणि माता सरस्वतीची पूजा करावी. सर्व देवतांची पूजा केल्यानंतर हवन करावे, मग नंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा.
- पूजा झाल्यावर मनोभावे आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी.
लक्ष्मी पूजन करतांना खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा, पाहा
- ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
- ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।
- ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।