Navin Marathi Ukhane 2023 – मराठी नवनवीन उखाणे : सर्व एकदन नवीन उखाणे आपणास येथे देत आहोत आवडल्यास नक्की शेअर करा
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ….. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
भाजीत भाजी मेथीची, ..… माझ्या प्रितीची.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ….. चे नाव घेतो सर्वजण ऐका.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
लग्नात लागतात हार आणि तुरे, ….. चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ….. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा, ….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ….. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, ..… चे नाव घेतो सर्व जण ऐका.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ….. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
काट्यात काटा गुलाबाचा काटा, ….. चं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, …. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, ….. बरोबर संसार करीन सुखाचा.
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, .…. चं नाव घेते देवापुढे.
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.
बुलढाण्याला जातांना लागतो अजिंठयाचा घाट ….. रावांचा आहे पाटलांसारखा थाट.
कन्या होतें मी मातृगृहीं, स्नुषा होऊनी आले सासरी ….. राव पति मिळाले भाग्यवान मी ठरलें खरी.
नोकरी असो, धंदा असो, नीतिमत्ता पाळावी ….. रावांच्या सहवासात सुंदर तत्त्वे असावी.
ठाण्याच्या डोंगरावर फुलला पळस ….. रावांच्या छत्रीला सोन्याचा कळस.
तुळशीला घालतें प्रदक्षिणा, विष्णूला करतें नवस ….. रावांचे नांव घेतें आज आनंदाचा दिवस.
दारापुढें ओटा, ओटयावर लावली तुळस ….. रावांच्या घरी होईल संसार सुखाचा कळस.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र होता ढगांत ….. रावांची कीर्ती पसरली जगांत.