महाशिवरात्री 2023: हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा होत आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाल्याची पौराणिक मान्यता आहे, म्हणून हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा आणि व्रत ठेवण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
महाशिवरात्री माहिती मुहूर्त पुजा कथा – Mahashivratri Puja katha Vidhi
महाशिवरात्री 2023 तारीख
यंदाचा महाशिवरात्री उत्सव १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८:०३ ते १९ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ४:१९ वाजेपर्यंत चालणार आहे.
महाशिवरात्री 2023 शुभ काळ
जर आपण या दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोललो, तर शुभ मुहूर्त 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:41 ते रात्री 9:47 पर्यंत असेल.
यानंतर 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 ते 12:53 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.
दुसर्या दिवशी 19 फेब्रुवारी 12:53 ते 3:58 पर्यंत शुभ राहील. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:58 ते 7:06 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.
उपवास पाळणारे लोक 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 6:11 ते पहाटे 2:41 पर्यंत उपवास सोडू शकतात.
महाशिवरात्री का साजरी केली जाते यामागे अनेक पौराणिक कथा दडलेल्या आहेत. पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्ती यांची भेट झाली. महादेवाचे भक्त महाशिवरात्रीची संपूर्ण रात्र जागून आपल्या कुलदेवतेची पूजा करतात. शिवभक्त या दिवशी भगवान शिवाचा विवाह साजरा करतात. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी शक्तीचा भगवान शिवशी विवाह झाला होता.
महाशिवरात्री कथा मराठी – Mahashiv ratri Katha
एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला
‘हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली.
दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.
सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली.
हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’
त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’
ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.
देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला.
सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . . . .