मराठी कथा – Marathi Katha – नवरा बायको रंजक कथा
मित्रांनो आजची कथा एका पती–पत्नी यांच्या जीवनामध्ये घडलेली डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे जी वाचून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आले
आपणास विनंती आहे की ही कहाणी आपण पूर्ण पहावी कारण नक्की तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही
मला त्याचा आधी फोटो बघायचा आहे त्यानंतरच मी माझा निर्णय देईल रीताने आईला म्हटले
काय आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहणार नाही का? आईने रागात म्हटले, रीता म्हणाली मला फोटो बघायचा आहे किंवा त्या मुलाला तरी घरी बोलून घे त्यानंतरच मी तुला माझा निर्णय देईल त्यावर आई म्हणाली मूर्ख झाली का तू?
इतक्यात तिचे वडील आले व म्हणाले काय झाले का बरं तू तिला रागवत आहेस ?
रिता वडीलाजवळ आली व म्हणाली बाबा मला मुला चा फोटो बघायचा आहे त्यांनातरच मी निर्णय देईल , वडील म्हणाले ठीक आहे उद्या मी त्याचा फोटो बोलावून घेतो
आम्ही तुझ्या इच्छे शिवाय तुझे लग्न लावून देणार नाहीत
दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलाचा फोटो बोलावून घेतला
फोटो बघताच तिला मुलगा खूप आवडला व तिने लग्नासाठी होकार दिला
येत्या दहा दिवसांमध्ये रिता चे लग्न सुशील सोबत होऊन गेले लग्न अरेंज असल्यामुळे कधीही दोघांची भेट झाली नव्हती एका दुसऱ्याला कधीच बघितले पण नव्हतं
लग्न एक असं पवित्र बंधन असतं दोन अपरिचित जीव एका दुसऱ्याचे होऊन जातात जे कधीही एकमेकांना जीवनात भेटले नाही ते काही क्षणात जीवनसाथी होऊन जातात तसेच काही रिता सोबत घडले
पहिल्या रात्री सुशील आईस्क्रीम घेऊन रूम मध्ये गेला रिता डोळे खाली करून बसून होती आईस्क्रीम तर तिची खूप फेवरेट होती सुशीलने तिला म्हटले आईस्क्रीम खाणार का ?
ती म्हणाली तुम्ही खाऊन घ्या आधी रीताने म्हटले त्यावर सुशील म्हणाला खाऊन घे प्रेम वाढेल आता रिता आईस्क्रीम खायला लागली
तेवढ्यात सुशील कपडे चेंज केले व इकडे रीताने पूर्ण आईस्क्रीम संपून टाकली आईस्क्रीम कुठे आहे मी खाऊन घेतली सुशील हसत हसत म्हणाला गेले माझे पन्नास रुपये आधी नाही म्हणाली व आता पूर्ण आइसक्रीम संपवून टाकली.
रिता पहिल्याच रात्री समजून गेली सुशील मनाचा खूप चांगला आहे
खूप छान गोष्टी सुद्धा करतो असं करता करता संसार सुरू झाल आणि वेळ असाच जात राहिला
रिता च्या भावाचे लग्न होते रिता ही चार महिन्याची गर्भवती असल्यामुळे सुशीलने तिला म्हटले तू भावाच्या लग्नात जाऊ नको डॉक्टरने तुला प्रवास करायला नाही म्हटले आहे
परंतु रिता काही त्याचे ऐकत नव्हती
त्याने तिला खूप समजावले त्यावर ती त्याला म्हणाली तुम्ही मूर्ख आहात का? माझ्या सख्या भावाचं लग्न आहे व तुम्ही मला नाही म्हणत आहे तुम्ही मला कार मध्ये बसून आरामात सोडून द्या
मी तिथे स्वतःची काळजी घेईल
परंतु सुशील ने तिला स्पष्ट नाही म्हटले दुसऱ्या दिवशी तिच्या भावाचा फोन तिला आला व त्याने विचारले ताई तू कधी येत आहे तुला चार दिवस अगोदरच यायचे आहे
त्यावर ती म्हणाली आमचे हे तुझे जिजाजी मला यायला मना करत आहे
माझी तर खूप इच्छा आहे पण मी काय करू दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ आई–वडील सर्व तिच्या घरी तिला घ्यायला आले
त्यांना बघून रिता खूपच जास्त खुश झाली परंतु सुशीलला तिची काळजी वाटत होती कारण ती गर्भवती होती म्हणून त्याने आई–वडील व भावाला सांगितले की तुम्ही हीला घेऊन जा पण हिला कोणताही त्रास होता कामा नये
आता रिता खूप खुश झाली
त्याने रिता ला हजार रुपये दिले व म्हणाला पैसे कमी पडत असतील तर अजून कपाटातून घेऊन घे रिता म्हणाली ठीक आहे इतके पैसे पुरतील व ती तिच्या भावासोबत आई–वडिलांसोबत लग्न घरी निघून गेली
लग्नाला चार दिवस शिल्लक होते मेंदी , हळद असे विविध कार्यक्रम होऊ लागले
एक दिवस अचानक खूप जोराचा पाऊस आला व सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं
घरातल्या टाइल्स वर सुद्धा काही प्रमाणात पाणी आले होते अचानक रीताचा पाय घसरला व ती पडली ती पडताच जोरजोराने रडू लागली तिच्या पोटात खूप वेदना व्हायला लागल्या लगेच आई वडील व भावाने तिला रुग्णालयात दाखल केले व त्याच्या पती सुशीलला फोन लावून सांगितले सुशील हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली
तो तात्काळ रुग्णालयात हजर झाला रिता खूप रडत होती तितक्यात डॉक्टर आले व म्हणाले आम्ही तुमच्या बाळाला वाचू शकलो नाही माफ करा
रिता खूप रडत होती व ति स्वतःलाच दो ष देत होती मीच यांच ऐकले नाही म्हणून मला माझ मूल गमवावे लागले
ती स्वतःला खूप कोसत होती परंतु सुशील शांतपणे तिला समजावले रीता देवाची जी इच्छा तेच होत असते आपल्या नशिबात हे मूल नव्हते असे समज
परंतु ती सतत स्वतःला कोसत होती म्हणत होती माझ्यामुळे हे झाले मला माफ कर
सुशीलने तिला बऱ्याच वेळा समजावले व त्यानंतर सुशील तिला घरी घेऊन गेला इकडे लग्न धुमधडाक्यात पार पडले लग्न झाल्यानंतर सर्व नातेवाईक तिची काळजी घ्यायला बघायला विचारपूस करायला येऊ लागले
असेच दिवस निघून गेले एका वर्षांनी तिला एक सुंदर मुलगा झाला
सुशीला एका छोट्या कंपनीमध्ये काम करत होता त्याला जास्त पगार सुद्धा नव्हता त्यात तो आपल्या गरजा पूर्ण करत असे
रिता त्याला म्हणाली मुलाला खूप गर्मी होत आहे घरामध्ये माझ्या बेडरूम मध्ये एसी लावून द्या
त्यावर सुशील म्हणाला आपली इतकी कमाई नाही की मी तुला एसी लावू देऊ परंतु रीता काही केल्या मानत नव्हती म्हणून त्याने नोकरीवर कर्ज घेऊन कसेबसे तिला एसी लावून दिला रिता खूप खुश झाली
असेच दिवस जात होते परंतु सुशील ची परिस्थिती काही चांगली होत नव्हती पगारवाढ मिळत नव्हती व नोकरीची सुद्धा शाश्वती नव्हती असेच दोन वर्षानंतर त्याला एक मुलगी झाली आता त्याच्यावर अजून जबाबदारी वाढवून गेली त्यात नोकरी खाजगी असल्याने त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे होऊ लागले कसेबसे तो आपलं घर परिवार चालवत असे
रिता त्याला नेहमी म्हणत होती तुम्ही आमच्या कोणत्याच गरजा व्यवस्थित पूर्ण करत नाही तो महिन्याकाठी रिता ला घर चालवण्यासाठी दहा हजार रुपये द्यायचा परंतु ती त्याला म्हणायची इतक्या कमी पैशात आम्ही कसं जगायचं तुम्ही दुसरी नोकरी तरी शोधा परंतु दुसरी नोकरी मिळवणे एवढं सोपं नसतं
इकडे रीता काही ना काही कारणावरून रोज त्याच्याजवळ वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करू लागली व आता त्याचे कंपनी सुद्धा बरोबर चालत नव्हती त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये राहू लागला आता तो घरात पैसे देत नसल्यामुळे रिता व त्याच्यात एक दिवस खूप वाद झाला तुम्ही मला घर खर्चाचे सुद्धा आता पैसे देत नाही
तुम्ही दिवसभर काय करता पैशाशिवाय मी कसं करू घर कसे चालवू
त्यावर त्याने म्हटले एक दोन दिवसात मी तुला ऍडजेस्ट करून पैसे देतो परंतु रीता काही त्याचे ऐकत नव्हती तो रागारागात घरातून निघून गेला रित्याने आपल्या आई–वडिलांना फोन लावला व सांगितले हे मला आता घर खर्चाचे सुद्धा पैसे देत नाही आहे
मी आता घर कसे चालवू व नेहमी माझ्यासोबत वाद घालत असतात
दुसऱ्या दिवशी तिचे आई–वडील व भाऊ तिच्याकडे आला त्या दिवशी रात्रभर सुशील घरी आला नव्हता दुसऱ्या दिवशी सुशीला वाटले चला आपण हिला आता समजावून देऊ व पैसे पण कुठून तरी आपण ऍडजेस्ट केले तिला देऊन देऊ त्यासाठी घरी आला तर पहा आले तिची आई वडील भाऊ आले होते
आई वडील यांनी सुरज ला म्हटले काय झाले त्यावर सुरज म्हणाला काही नाही
आम्हाला असे समजले की तू आमच्या मुलीची योग्य काळजी घेत नाही आहेस व तू तिला आता पैसे सुद्धा देत नाहीस
तितक्यात रिता म्हणाली हा माझ्यासोबत रोज भांडण करतो व याची घराकडे लक्ष नाही असेच वाद वाढत गेला व सुशील ने रीताच्या गालफटीत आई–वडिलांच्या समोरच लगावली
त्यामुळे तिला सुद्धा त्याचा खूप राग आला व तिचे आई वडील तिला घेऊन आले
इकडे सुशील आता एकटा पडला होता अशातच त्याने ती नोकरी सुद्धा सोडून दिली व आता तो दिवसभर घरीच असे जवळ पैसा नव्हता
त्यातच महिना निघून गेला इकडे त्याची बायको आई–वडिलांकडे भावासोबत राहू लागली त्याने सुद्धा तिला काही फोन केला नाही व तिने सुद्धा त्याला एकही फोन केला नाही कारण दोघांनाही असे वाटत होते की आपण आपल्या जागी योग्य आहे
असेच पाहता पाहता आता तीन महिने झाले होते तरीसुद्धा कोणीही एकमेका सोबत बोलले नव्हतं व घरच्यांनी सुद्धा सुशील सोबत कॉन्टॅक्ट केला नाही अशातच एक दिवस सुशीलला त्याच्या मित्राचा फोन आला व त्याने म्हटले की तुझ्यासाठी एक खूप चांगली नोकरी आहे परंतु नोकरीसाठी तुला दुबई जावे लागेल त्याने विचार केला पैसा आला की सर्व व्यवस्थित होऊन जाईल मग तो दुबईला निघून गेला आता त्याचा मोबाईल नंबर सुद्धा बंद झाला होता त्याने नवीन नंबर दुबईला घेतला होता परंतु मनात मुला मुलीची आठवण बायकोची आठवण सतत येत होती इकडे त्याची बायको जाऊन आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आलं होतं
मुलांच्या इच्छा आकांक्षा आता सर्व भावावर अवलंबून झाल्या होत्या व वहिनी सुद्धा आता तिला टोमणे मारत असे
मुलांसाठी फटाके आणण्यासाठी दिवाळी होती म्हणून तिने भावाला म्हटले मला काही पैसे दे मुलं फटाके व कपडे मागत आहे तितक्या तिची वहिनी आली व म्हटले आहो इथे आपल्या गरजा पूर्ण होत नाही आपण हिच्या मुला बाळांचे कधीपर्यंत करायचं तुम्ही आता हिचे दुसरे लग्न लावून द्या
हे ऐकतास तिच्या पायाखालची जमीन सरकली
ती गयावया करू लागली की मला दुसरे लग्न नाही करायचे
माझ्या नवऱ्यावर सुशील वर माझे खूप प्रेम आहे तिने लगेच त्याचा मोबाईल नंबर डायल केला परंतु फोन स्विच ऑफ येत होता आता काय करावे तिला कळत नव्हती ती सतत देवाजवळ प्रार्थना करत होती तिकडे दुबईमध्ये सुशीला सुद्धा मुलांची आठवण व बायकोची आठवण खात होती आता पैसा सुद्धा जवळ आला होता
इकडे तिच्या भावाने तिच्यासाठी एक लग्न झालेला व्यक्ती लग्नासाठी पाहून ठेवला व त्याला दोन मुले होती आता रिताचे लग्न लावून देणार म्हणून ती खूप अस्वस्थ झाली होती
ती दिवसभर रडत होती तिला काही कळत नव्हते काय करावे काय नाही परंतु देवाने व नशिबाने काही वेगळेच तिच्या नशिबात लिहिले होते
सुशीलच्या मनात आले की आता मुला बाळांना व बायकोला दुबईला घेऊन यावे म्हणून त्याने भारतामध्ये येण्यासाठी तिकीट केले व दुसऱ्या दिवशी तो भारतामध्ये आला सरळ बायकोच्या घरी गेला त्याची बायको कपडे धुवत होती सुशीलला दारात पाहताच ती धावतच आली व त्याला मिठीत घेऊन खूप रडू लागली
तो पण तिला मिठीत घेऊन खूप रडू लागला व तिने ताठ मनाने भावाला वहिनीला सांगितले माझा नवरा आला आहे आता तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही व दुसऱ्या दिवशी ती तिच्या मुलांना घेऊन नवऱ्याकडे निघून गेली
नवऱ्याने तिचा व मुलांचा पासपोर्ट विजा सुद्धा बनवून घेतला व घेऊन निघून गेला ….
फक्त एक शुल्क कारणावरून हे लग्न तुटण्यावर आलं होतं असे अनेक उदाहरण आपण समाजात आजूबाजूला बघत असतो म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की टोकाचे पाऊल घेऊ नका कारण घर संसार मध्य वाद–विवाद होतच असतात परंतु त्यातून घटस्फोट हा एकच मार्ग नसतो त्यामुळे जीवन कसे विस्कळीत होऊ शकते हे आपण या कथेतून पाहिले तरी मित्रांनो आपणास ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तसेच लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा