घराचे केले वृद्धाश्रम..
म्हातार्या आईने मुलाला दिला असा धडा
रमाबाई खूप चिंतीत होत्या कारण त्यांच्या सुनेने सकाळपासून त्यांना काहीच खायला दिलं नव्हतं. त्यांच्या सुनेने सकाळी आलूचे पराठे केले होते आणि ते सगळे संपून गेले होते, त्यांच्यासाठी त्यांनी काहीच शिल्लक ठेवलं नव्हतं. रमाबाईला वाटलं आता नाश्ता तर नाही शिल्लक तर जेवण लवकर करेल सून पण तिने आज स्वयंपाक केलाच नाही, दुपारी रमाबाई ने विचारलं मला खूप भूक लागली आहे सुनबाई काही तरी द्या खायला त्यावरती सून पुटपुटली म्हणाली तुम्हाला कामधंदे काही नाही खाण्याशिवाय. मी दुपारी मैत्रिणी सोबत शॉपिंग ला चालली आहे आता मी संध्याकाळचा स्वयंपाक च करीन तोवर डायनिंग टेबलवर फुटाणे ठेवले ते खाऊन घ्या नंतर थोड्यावेळाने तिने फ्रीज उघडलं तर त्यात तिन शिळ्या पोळ्या होत्या, ती म्हणाली तीन पोळ्या आहेत रात्रीच्या त्या खाऊन घ्या सासू बाई . रमाबाईला शुगर होती म्हणून त्यांना खूप भूक लागायची तरी त्यांनी त्या शिळ्या पोळ्या काही खाल्या नाही आणि डस्टबिन मध्ये टाकल्या. सासू म्हणाली मी आपल्या हाताने काही करून घेईल, तू काळजी नको करू माझी . मग सून गेल्यावर तिने खिचडी केली व चटणी सोबत खाल्ली. तिची सून संध्याकाळी ६ वाजता फिरून आली. येताच नवऱ्याला म्हणाली घरात खर्च खूप होत आहे . इतका घर खर्च आपल्याला परवडत नाही .
रमाबाईचे पती म्हणजेच तिचे सासरे सगळं घर चालवायचे. मुलगा परागला घर चालवायची काही गरज पडत नव्हती तो आपले पैसे जमा ठेवत होता पण सासरे गेल्यावर त्याला सगळं खर्च करावा लागत होता ते त्याला आता जड वाटत होतं.
एकदा रमाबाईंच्या पतीची खूप जास्त तब्येत खराब झाली तेव्हा औषध व दवाखाना चा खर्च खूप झाला म्हणून परागने अर्धीच औषध घेतली
पण त्यांची तब्येत बरी झाली तर त्यांनी औषध बंद करून दिली पण दुसऱ्या दिवशी रात्री त्यांची तब्येत अचानक पुन्हा खराब झाली, मुलगा वर रूममध्ये राहत होता, पराग ची आई धावत त्याला उठवायला गेली म्हणाली बाबाची तब्बेत खूप खराब झाली तू लवकर चल खाली , तो म्हणाला मी खूप थकलो आहे मला झोपू दे. बिचारी आई रडत रडत खाली जाते अहो काही बोला पण ते काही बोलत नाही. त्यांना वेळेवर उपचार मिळाला नाही व त्यांचा त्यात मृत्यु झाला. सकाळी सून आणि पोरगा खूप रडू लागले, जणू काही त्यांना खूपच काळजी होती बाबाची , असे ते सर्वांना दाखवू लागले , त्यांनी सर्व कार्यक्रम केले, जेवण केलं , संस्कार, सगळं लोकांना खूप दाखवलं की आम्ही खूप आई-वडिलांचं करतो म्हणून पण आत मधून रमाबाईला सगळं माहित होतं. त्या मनातल मनातच ठेवून होत्या आणि कुणाला सांगू शकत सुद्धा नव्हत्या. काही दिवसांनी ज्या रूममध्ये रमाबाई राहत होत्या ती खोली त्यांचा मुलगा म्हणे मी भाड्याने देऊन देतो म्हणजे घर खर्चाला मदत होईल. त्या म्हणाल्या मी कुठे राहू मग , तू या छोट्या रूममध्ये रहा, ती म्हणाले ही छोटी रूम नाही तर स्टोअर रूम आहे, मी स्टोअर रूम मध्ये कशी राहू, तिथे संडास बाथरूम पण नाही त्यावर मुलगा म्हणाला, बाहेर अंगणामध्ये आहे तो वापर, तू तर घरचीच आहे.
आई म्हणाली मला इतक्या दूर जाने व येणे आता शक्य नाही आहे . त्यावर मुलगा काही बोलला नाही. अजून ते घर त्याच्या आई च्या नावे होत . रमाबाईची एक मैत्रीण होती तिच्या जवळ ती आपले सुख दुख सांगत असे. आता गोष्टी करता करता आजीच्या मनात आले, का नाही यांना धडा शिकवावा. ती आपल्या मुलाला सुनेला म्हणाली मी तुम्हाला खूप जड होत आहे, आता मी वृद्धाश्रमात राहायला चालली आहे . त्यावर सून आणि पोरगा मनात खूप खुश झाले, मुलाने थोडं नाराज व्हायचं नाटक केलं पण नंतर तोही खूप खुश झाला. सुनेला वाटले आता आपल्याला सासूच काही करावं नाही लागणार. औषध पण आणावे लागणार नाही. आपल्या घरचे ओझं कमी केलं. त्यावर रमाबाई म्हणाला थांबा थांबा माझी पूर्ण गोष्ट तर ऐका हे घर माझ्या नावे आहे . म्हणून मी या घरालाच वृद्धाश्रम बनवणार आहे. काही वृद्ध लोक मी ठेवणार आहे व वरची रूम किरायाने देणार आहे म्हणून तुम्ही तुमची तयारी ठेवा. मुलगा असे ऐकताच चक्रावून जातो व म्हणतो तू असे कसे वागू शकते आमच्याशी आमचे काही चुकले असेल तर माफ कर आम्ही कोठे राहू. आई काहीच बोलत नाही , आई मला माफ कर मी तुझ्याशी वाईट वागलो पण आता आई त्यास माफ करत नाही , ती म्हणते तुम्ही माझा खूप छळ केला ,मला त्रास दिला, तुझ्या निष्काळजी मुळे तुझे वडील गेले आम्ही तुला एक एक पैसा जोडून तुझ्या पायावर उभा केला. आता तू तुझ पहा , नंतर एक महिन्यांनी त्यांच्या मुलांने व सुनेने घर सोडले आणि निर्मला बाईने तिथे एक छोटा आश्रम सुरु केला आणि गरजू लोकांना मदत केली. यावरून असं कळते की वेळेनुसार कधी कधी कठोर बनाव लागतं त्याशिवाय समोरच्याला आपली किंमत कळत नाही
तात्पर्य —
आई–वडील मुलांच्या सगळ्या चुका माफ करतात पण शिक्षा देणेही तेवढेच महत्त्वाची असते