मित्रानो , नमुना 8 जमीन चे मालक चे एक दस्तावेज आहे आपणास हे document ग्रामपंचायत देत असते . जेव्हा तुम्ही घर किवा प्लॉट किवा दुकान घेता व ते ग्रामीण शेत्रात येत असेल तर तुम्हाला खरेदी ची प्रत घेऊन ग्रामपंचायत मध्ये फेरफार करावा लागतो त्यासाठी ग्रामपंचायत काही शुल्क आकारते व आपणास फेरफार करू नमुना 8 देते.
8 अ उतारा म्हणजे काय?
8 अ उतारा म्हणजे ज्या गावातील तो उतारा आहे त्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची जमीन आहे याची माहिती देणारा उतारा.
नमुना 8 PDF डाऊनलोड – Namuna 8 Download
रामपंचायत नमुना 8 चा उतारा कुठे मिळेल
8 अ च उतारा मिळवायचे २ मार्ग आहेत,एक म्हणजे जमिनीचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा तुम्ही तलाठी कार्यालयातून / घराचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा ग्रामपंचायत मधून घेऊ शकता किंवा दूसरा मार्ग म्हणजे तो तुम्ही ऑनलाइन डाऊनलोड देखील करू शकता. तलाठी कार्यालयातून किंवा ग्रामपंचायत मधून नमुना 8 चा उतारा घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन तो घ्यावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने हा उतारा मिळवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमाने तुम्ही डाऊनलोड करू शकता.
- https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट ल भेट द्या.
- या वेबसाइट वर आल्यावर समोर दिसत असलेल्या स्क्रीन वर तुमचा विभाग निवडा.
- त्यानंतर 8 अ वर क्लिक करा.
- खाली तुमचा जिल्हा,तालुका आणि गाव निवडा.
- तुम्हाला तुमचा गट नंबर माहीत असल्यास खाते नंबर वर क्लिक करून समोर येणार्या बॉक्स मध्ये तुमचा गत नंबर टाका.
- त्यानंतर सर्च बटन वर क्लिक करा.
8 अ चा उतारा असल्याचा फायदा:
१) 8 अ च्या उतार्या मार्फत एकाच व्यक्तीच्या मालकीची वेगवेळ्यात ठिकाणी म्हणजेच वेगवेगळ्या गटात असलेली एकूण जमीन कळते.
२) 8 अ चा उतारा प्रशासनाला म्हणजेच ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना कर गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
३) तुम्ही जर जमीन खरेदी करत असाल तर ग्रामपंचायत नमुना 8 च्या उतार्या मुळे तुम्हाला जमिनीची सर्व माहिती मिळते जसे की जमिनीचे मालकी हक्क वयक्तिक आहेत का सामूहिक तसेच जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे हे देखील कळते. त्या मुळे जमीन खरेदी विक्री मध्ये या उतार्यामुळे फसवणुकीला आळा बसतो.
४) एखाद्या जागेवर किंवा घरावर तसेच नवीन घर बांधकामासाठी तुम्हाला काही कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत नमूना 8 हा उपयोगी पडतो.
सारांश :
वरील माहिती वरून आपणास नमुना 8 चे उपयोग व pdf नमुना 8 अ मिळाला असेल . आपणास काही विचारयाचे असेल तर कॉमेंट करा .