नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीची मार्कशीट जर हरवली असेल आणि ओरिजनल मार्कशीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये संपूर्ण स्टेप्स समजून सांगणार आहोत ज्या स्टेप्स फॉलो करून आपण घरच बसून आरामात आपली Marksheet online पद्धतीने डाउनलोड करू शकाल
मित्रांनो दहावी आणि बारावीची मार्कशीट ही खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट असते आणि ते जर हरवले तर आपण बऱ्याचश्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो म्हणूनच शासनाने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे व त्यावरून शासन तुमच्या मागशील व्हेरिफाय सुद्धा करतो व तुम्ही सुद्धा तुमच्या मार्कशीट तिथून डाऊनलोड करू शकता
दहावी आणि बारावीची मार्कशीट ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कशी करावी
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये दहावी बारावी मार्कशीट डाउनलोड असं टाईप करायचं आहे
त्यानंतर तुमच्यासमोर बोर्ड मार्कशीट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन ही वेबसाईट येईल या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे
त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये तुमचे नाव तुमची कॅटेगिरी इंडिव्हिज्युअल, इन्स्टिट्यूट किंवा other यापैकी सिलेक्ट करायची आहे
त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर दहावी बारावी किंवा मग दोन्ही सिलेक्ट करायचे आहे
त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आयडी तुमचा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड येथे टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे तोच पासवर्ड परत टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅपच्या कोड आहे तो भरून टाकायचा आहे आणि शेवटी आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन यावर टिक करायचे आहे आणि तुम्हाला रजिस्टर करायचं बटन खाली दिलेला आहे त्यावर क्लिक करायचे आहे
अशा पद्धतीने तुम्हाला यावर रजिस्टर करून घ्यायचे आहे
त्यानंतर आता तुम्हाला व्हेरिफाय एसएससी अँड एच एस सी मार्कशीट या टॅब च्या खाली तुमचा युजरनेम म्हणजेच ईमेल आयडी व तुम्ही ठेवलेला पासवर्ड व व्हेरिफिकेशन कोड जो खाली तिथे दिलेला आहे तोच टाकायचा आहे व साइन इन बटन वरती क्लिक करायचे आहे
दहावीची मार्कशीट कशी डाऊनलोड करावी – Maharashtra SSC/HSC Marksheet Download
तुम्हाला सर्वप्रथम तुमचे दहावीचे उत्तीर्ण वर्ष सिलेक्ट करायचे आहे
त्यानंतर तुम्हाला दहावी परीक्षेचा निकालाचा महिना म्हणजे मार्च किंवा फेब्रुवारी जो असेल तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आसन क्रमांक दहावीचा टाकायचा आहे
त्यानंतर तुम्हाला एकूण गुण तुम्हाला दहावीत किती होते ते टाकायचे आहे
त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे आणि याला सबमिट करून द्यायचे आहे
सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे डिटेल्स येईल ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली एक बटन दिलेला आहे त्यावरती लिहिला आहे गेट मार्कशीट पीडीएफ त्यावर आता क्लिक करायचे आहे
ते क्लिक करताच तुमची दहावीची मार्कशीट तुमच्या समोर येईल एक चांगला फोटो पेपरवर त्याची कलर प्रिंट मारून घ्यावी अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमची ओरिजनल मार्कशीट ऑफिशियल वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकाल
वेबसाइट लिंक – link
ऑनलाइन दहावी बारावीची मार्कशीट काढण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या
बारावीची मार्कशीट ऑनलाईन पद्धतीने कशी डाउनलोड करावी
वरील सांगितल्या पद्धतीने सुद्धा बारावीची मार्कशीट तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे वरील दिलेल्या संपूर्ण स्टेप्स तुम्हाला फॉलो करणे आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बारावीची मार्कशीट डाउनलोड करू शकणार तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा आणि या आर्टिकल ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद