पीक कर्ज योजना 2023 ऑनलाईन अर्ज – pik karj Yojna 2023 Apply Online : नमस्कार, शेतकरी बांधवांनो आजच्या या लेखांमध्ये आपण खरीप पिक 2023 करिता कर्जाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत
शेतकऱ्यांना सुलभ रित्या कर्ज मिळावे तसेच कर्ज वाटताना शेतकऱ्यांना बँकेमध्ये बऱ्याच वेळा जाणे येणे करावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांचं वेळ व पैसा वाया जातो म्हणूनच िविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून पीक कर्जासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत
खरीप पिक कर्ज योजना ऑनलाइन अर्ज परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन पद्धतीने अर्जाची सुरुवात झाली आहे
यामध्ये ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे , कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे ही सर्व माहिती तसेच हा अर्ज कुठल्या वेबसाईटवर करायचा आहे हे सर्व आम्ही तुम्हाला या लेखात समजून सांगणार आहोत
पीक कर्ज योजना मध्ये ऑनलाईन अर्ज कोठे करावा
मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे जे संकेतस्थळ आहे तिथे पीक कर्ज नावाची एक टॅब उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जावे लागेल
उदाहरणार्थ –
parbhani.gov.in ही परभणी जिल्ह्याचे संकेत स्थळ आहे या संकेतस्थळावर पीक कर्ज नावाची एक टॅब दिली आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आहे
आता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या वेबसाईटवर आपण पीक कर्ज टॅब वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर
- नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा
- अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
असे दोन पर्याय उपलब्ध होतील
ऑनलाइन पीक कर्ज फॉर्म —
आता तुम्हाला पीक कर्ज व्यवस्थापन प्रणाली मध्ये पिकांची व तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे
- शेतकऱ्याचे नाव
- मोबाईल क्रमांक
- आधार क्रमांक
- पॅन कार्ड क्रमांक
- राज्य जिल्हा तालुका गाव
- बचत खात्याची माहिती
- त्यानंतर तुम्हाला नवीन कर्जासाठी नोंदणी करायची आहे का किंवा आपल्याला सध्याचं कर्जाचे नूतनीकरण करायचं आहे का हे निवडा
- त्यानंतर आपल्या कर्ज खात्याची माहिती भरायची आहे
- त्यानंतर आपल्या शेतजमिनीची माहिती व लागवड केलेल्या पिकाची माहिती भरायची आहे आणि प्लस बटन वरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे पीक असेल ते सुद्धा तुम्ही क्षेत्र पीक सर्वे क्रमांकानुसार या मध्ये ऍड करू शकता
हे संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला ते सेव्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुमची अर्जाची यशस्वीरित्या नोंद झाल्यानंतर तुम्हाला पुढील कारवाईसाठी संबंधित बँकेचे प्रतिनिधी आपणास संपर्क करणार
तुमच्या अर्जाची स्थिती कशी पहावी –
पाहण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर सद्यस्थिती नावाचे एक ऑप्शन मिळतं त्याचा तुम्ही उपयोग करू शकता त्याकरता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमची सद्यस्थिती बघता येणार आहे
यात युजर आयडी मध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे आणि पासवर्ड मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर समोर काय करावे
मित्रांनो या ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बँकेच्या माध्यमातून तपासली जाईल बँकेने माहिती तपासून तर आपण पात्र असाल तर पात्र असल्याबद्दल ची माहिती आपल्याला दिली जाईल आणि अपात्र असल्याचे कारण लॉगिन मध्ये तुम्हाला प्राप्त होईल
तुम्हाला आता कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला बँक करायला लागेल आणि एकदा की तुमचे कागदपत्र पूर्ण झाले की तुम्हाला कर्ज दिले जाईल
ही जी प्रक्रिया आहे ती परभणी जिल्ह्यासाठी मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही इतर जिल्ह्यासाठी अर्ज भरू शकतात या ज्या जिल्ह्यांच्या लिंक्स उपलब्ध होतील ती मी इथे अपडेट करून तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेल
सारांश –
तरी मित्रांनो हा लेख आपणास आवडल्यास नक्की सर्व शेतकरी बंधून पर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आपणास काही शंका असेल तर आपण कमेंट करून विचारा धन्यवाद