[2023] शेततळे अनुदान योजना - पात्रता अनुदान ऑनलाइन अर्ज - Shettale Yojna 2023

Shweta K
By -
0

शेततळे अनुदान योजना : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022 23 अंतर्गत सामूहिक शेततळ्यासाठी महाडीबीटी अंतर्गत पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहे आधी फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरू होते आता महाडीबीटी मार्फत हे अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता

[2023] शेततळे अनुदान योजना – पात्रता अनुदान ऑनलाइन अर्ज – Shettale Yojna 2023

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेततळ्यासाठी या पोर्टलवर अर्ज सादर करावे असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे

महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू असल्या कारणे पावसावर अवलंबून असतात आणि पाऊस ची तितकी उपलब्धता नसल्याकारणाने उत्पन्नावर खूप मोठा प्रभाव पडतो

कोरडवाहू जमीन मुरमाड जमीन तसेच डोंगर माथ्यावरील जमीन या जमिनीमध्ये बोरवेल सुद्धा खोदल्यास पाणी लागण्याची खूप कमी शक्यता असते म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून शेततळे अनुदान योजना किंवा मागील त्याला शेततळे योजना ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या योजनेमध्ये आपण कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे ? पात्रता काय असणार आहे? कोणती कागदपत्रे आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे? तसेच अर्ज कुठे आणि कसा करावा हे सुद्धा आपण पाहणार आहोत

शेततळे अनुदान योजना 2023 साठी पात्रता

  • शेतकऱ्याच्या नावावर किमान 0.6 हेक्टर जमीन असणे आवश्यक
  • पूर्वी केलेले शेततळे, नैसर्गिक खड्डा, दगड खाणी, विहीर इत्यादी. जागी सामूहिक शेततळे/वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण मंजूर करण्यात येणार नाही.
  • कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा व कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अर्जदार पात्र राहतील.
  • सामूहिक शेततळे या घटकाकरीता राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील अर्जदार पात्र राहतील. मात्र उपरोक्त २५ जिल्हे वगळता इतर जिल्यांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना सामूहिक शेततळे हा घटक अनुज्ञेय राहणार नाही.
  • शेतकऱ्याने यापूर्वी शेततळे योजना किंवा सामूहिक शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • लाभार्थी शेतकऱ्याचे शेततळ्याचे काम संपल्यानंतर सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे बंधनकारक राहणार
  • शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी सुखम सिंचन पद्धतीचा वापर करणे बंधनकारक राहील.
  • या योजनेअंतर्गत मंजूर आकाराचे शेततळे खोदणे बंधनकारक असणार
  • लाभार्थ्यांने शेततळे अस्तरीकरणासाठी अधिकृत ५०० मायक्रॉनची प्लास्टिक फिल्म वापरणे बंधनकारक राहील.
  • सामूहिक शेततळे घटकाचा लाभ हा शेतकरी समूहासाठी आहे. समूहात २ किंवा अधिक शेतकरी असावेत. शेतकरी संयुख कुटुंबातील नसावेत. शेतकऱ्याचे जमीन धारणेबाबतचे ७/१२ खाते उतारे स्वतंत्र असावेत.
  • शेततळ्याची काळजी ठेवण्याचं आणि त्याची निगा राखण्याचं जबाबदारी ही शेतकऱ्याची असणार
  • कृषी विभागामार्फत शेततळे तपासणी झाल्यानंतर ज्या जागी शेततळे निश्चित करण्यात आला आहे त्याच काल जागी ते खोदणे बंधनकारक असणार
  • शेततळे अनुदान योजनेसाठी लॉटरी लागल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्या मार्फत आदेशान्वये पुढील तीन महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक असेल

शेततळे अनुदान योजना 2023 साठी लागणारी कागदपत्रे – Shettale Yojna Document List

  • शेतकऱ्याची आधार कार्ड
  • शेत जमिनीचा सातबारा जमिनीचा
  • 8 अ चा उतारा
  • शेततळे खोदण्यासाठी साधन किंवा उपकरण चे कोटेशन
  • मान्यताप्राप्ती कंपनीचे टेस्टिंग रिपोर्ट
  • लाभार्थी जात प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
  • हमीपत्र पूर्वसंबंधी पत्र शेतकरी करारनामा लॉटरी लागल्यानंतर
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक

शेततळ्याकरिता लाभार्थ्याची निवड – shettale nivad

दारिद्र रेषेखालील शेतकऱ्यांना व ज्या शेतकर्‍याच्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली असल्यास त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात येतो

याव्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड जेष्ठता यादीनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे शेततळ्यासाठी निवड करण्यात येते

शेततळ्यासाठी अनुदान किती मिळणार

शेततळ्यासाठी किती अनुदान मिळणार हे सामान्यतः शेततळ्याच्या आकारावरती इनलेट आणि आउटलेट अस्तरीसह व बिनस्तरीसह इत्यादी निकषा नुसार अनुदान दिलं जातं

शेततळ्या साठी मिळणारे अनुदान आकारमानानुसार –

शेततळ्यासाठी अनुदान किती मिळणार

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा – Apply Online Shettale Yojna

  1. सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी नोंदणी करते वेळेस टाकलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे
  2. जर तुम्ही अद्याप पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे
  3. एकदा तुमचा रजिस्ट्रेशन झालं की मग लॉगिन करा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल
  4. डॅशबोर्ड दिसल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
  5. अर्ज करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चार ऑप्शन येतील त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बी बियाणे व खते यांचा समावेश असेल
  6. सिंचन साधने व सुविधा या पर्याय तुम्हाला निवड करायची आहे त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल
  7. ज्या ठिकाणी तुम्हाला पुढील घटक निवडायचे आहे मुख्य घटक मध्ये तुम्हाला सिंचन साधने सुविधा वैयक्तिक शेततळे उपघटक अस्तरीसह निवडा

वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सेव करून घ्यायचा आहे उपघटक तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार निवडू शकाल

तुम्हाला संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला 22 रुपये ते 23 रुपये ऑनलाईन फीस भरावी लागेल

फीज भरल्यानंतर शेततळ्यासाठी केलेल्या अर्जाची फीज पावती व अर्जाची प्रत डाऊनलोड करून किंवा जरा काढून तुम्ही जतन करा


पात्र शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून लॉटरी लागल्यानंतर मेसेज पाठवण्यात येतात व संबंधित जी पुढील कार्यवाही आहे ती कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्या मार्फत पूर्ण केली जाते

शेततळ्यासाठी अनुदान हा किती देण्यात येत असतो

सामान्यतः आकारमानानुसार अनुदान हे देय असते जवळपास 75 हजार रुपये पर्यंत तुम्हाला शेततळ्यासाठी अनुदान मिळतो

शेततळे योजनेसाठी सध्या कोणत्या वेबसाईटवर अर्ज सुरू आहेत

शेतकऱ्यांसाठी सर्व योजना करिता शासनाने महाडीबीटी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे तेथे तुम्ही हा अर्ज करू शकता

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येईल

आम्ही तुम्हाला वर या लेखामध्ये संपूर्ण स्टेप सांगितलेल्या आहे त्यानुसार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे

शेततळ्यासाठी कमीत कमी किती जमीन असणे गरजेचे आहे

शेततळ्यासाठी कमीत कमी 0.6 आर जमीन असणे आवश्यक आहे

सारांश

मित्रांनो आजचे लेखांमध्ये मागील त्याला शेततळे शेततळे अनुदान योजना याची आपण संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपणास देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही आपणास काही शंका असेल किंवा काही विचारायचे असेल तर कमेंट करून विचारू शकता

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)