नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तार बंदी योजना महाराष्ट्र 2023 बाबत संपूर्ण माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे त्यांना अनुदान किती मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ कोणती कोणती कागदपत्र असणे गरजेचे आहे आणि अर्ज ऑनलाईन करावा की ऑफलाईन करावा आणि कशा पद्धतीने करावा ही संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये देणार आहे तरी हा लेख शेवटपर्यंत संपूर्ण वाचून समजून घ्यावा
तार बंदी योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती अर्ज पात्रता अनुदान – Tarbandi Yojna Mahiti
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना घेऊन येत असतो त्यापैकी एक नवीन योजना म्हणजे तार बंदी योजना आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान दिलं जातं या योजनेच्या मदतीने शेतकरी भटके जे जनावर आहे रानटीचे प्राणी आहे त्यांच्यापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकतो म्हणूनच त्यादृष्टीने सरकारने नवीन ही योजना आणलेली आहे जेणेकरून पिकांचं जंगली प्राण्यांपासून संरक्षण होऊ शकेल
Tarbandi Yojna – तारबंदी योजना महाराष्ट्र उद्दिष्ट
भटक्या जनावरांपासून शेत पिकाच संरक्षण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे फटक्या जनावरे एक नष्ट करून पिकाची नासाडी करतात व त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं आणि सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही भीती असते ती समस्या सरकारने लक्षात घेऊन शेताच्या कडेने कुंपण घालण्यासाठी 40 ते 50 हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्याला या योजनेमार्फत सरकार देते
तारबंदी योजनेसाठी शेतकऱ्याला किती अनुदान मिळते
तारबंदी योजनेसाठी शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाणार असून याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान हे शेतकऱ्याला स्वतःला करावे लागते या योजनेतून मिळणारी रक्कम थेट शेतकरी जे लाभार्थी आहे त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये येते या योजनेचा लाभ जे शेतकरी देऊ इच्छितात त्यांना शेतकऱ्यांना ऑनलाइन मोबाईल द्वारे किंवा लॅपटॉप द्वारे अर्ज करावा लागतो
तारबंदी योजना महाराष्ट्र पात्रता
- ज्या शेतकऱ्याकडे लागवडीसाठी झिरो पॉईंट पाच एकर इतकी जमीन आहे त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येतो
- 400 मीटर ची तार बंद झाल्यास शेतकऱ्याला अनुदान दिल्या जाते
- या योजनेचा लाभ राज्यातील सर्व अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येतो
- अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे बँकेचे खाते आधार कार्ड ची लिंक असणे गरजेचे आहे
तारबंदी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – Document List For Tarbandi Yojna 2023
मित्रांनो कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे अद्यावत कागदपत्र असणे खूप गरजेची आहे ताराबंदी योजनेसाठी खालील कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे
- अर्जदाराकडे मतदान कार्ड
- राशन कार्ड
- जमिनीचा सातबारा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी दाखला
- व चालू मोबाईल नंबर
अर्ज कोठे करावा – हाऊ टू अप्लाय तारबंदी योजना ऑनलाईन 2023
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जावे लागेल
- अर्जदार कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन देखील हा अर्ज भरू शकतो
- तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे सीएससी चालकाला द्यावी लागतील
- त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती अपलोड केली जाईल
- एकदा अर्ज भरून झाला की त्यानंतर अधिकाऱ्यामार्फत तुमच्या अर्जांची व कागदपत्रांची पडताळणी केल्या जाईल
- अर्ज पडताळणी यशस्वीरित्या झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल
- व त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल
महत्त्वाची सूचना >>>
ही योजना सध्या राजस्थान मध्ये राबविण्यात येत आहे महाराष्ट्रात ही योजना अद्याप सुरू झालेली नाही याची नोंद वाचकांनी घ्यावी