तब्बल सहा हजार वर्षे चालणार बॅटरी - Electric Vehicle & Mobile Phone Battery Invention

Shweta K
By -
0

Electric Vehicle & Mobile Phone Battery : मोबाईल पासून विद्युत वाहनापर्यंत प्रत्येक ठिकाणी आवश्यक असलेल्या बॅटरीचे जीवनमान आता खूप वाढणार आहे कारण डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजेच डायट ने तब्बल 6000 वर्षे टिकू शकणाऱ्या बॅटरीची निर्मिती करण्यात येत आहे या बॅटरीमुळे देशाची अर्थव्यवस्था बदलू शकणार आहे

देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थेपैकी एक असलेले डायट यांचे कुलगुरू डॉक्टर सी पी रामनारायण यांनी डायट मध्ये चालू असलेल्या संशोधनाबाबत पत्रकारांना माहिती दिली.

विविध क्षेत्रांमध्ये संशोधनाचे सादरीकरण सोमवारी 15 मे रोजी होणाऱ्या पदी प्रदान कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासमोर करण्यात येणार आहे

आपल्या सर्वांना ठाऊक आहे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच पेट्रोल व डिझेल वरील दुसऱ्या देशावरील भारताची निर्भरता कमी करण्यासाठी विद्युत किंवा बॅटरीवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात वापरले जाणे आवश्यक आहे परंतु यामध्ये जी बॅटरी आहे तिचे आयुष्य हे जास्त नसते म्हणूनच जर या बॅटरीचा आयुष्यमान वाढलं तर एक नवीन युग निर्माण होण्यास वेळ लागणार नाही

भाभा अनुसंधान केंद्राच्या सहकार्याने संशोधन करण्यात येत आहे या तंत्रज्ञानात नॅनो डायमंड हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो हा न्यानो डायमंड प्रयोगशाळेत तयार करण्यात आला त्यामुळे बॅटरीचे आयुष्यमान हे अमर्याद वाढू शकेल सुमारे 6000 वर्षे म्हणजे अनेक पिढ्या एकच बॅटरी चा वापर करतील या बॅटरीचा पुनर्वापर करता येत असल्याने ही एक स्वच्छ ऊर्जा असणार आणि त्यामुळे जागतिक अर्थक्रांती होणार असे डॉक्टर रामनारायण यांनी सांगितले

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा –

लिंक

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)