WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांचा गंभीर इशारा - कोरोंना पेक्षा भयंकर आजारासाठी जगानं तयार राहावे

Shweta K
By -
0


गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोना ने थैमान घातला ते आपण सर्वांनी पहिले आता कुठे कोरोनाचे संकट थोडं ओसरत असतानाच WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम गेब्रियेसस यांनी गंभीर इशारा दिला आहे

जेनीव्हा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या असेंबली मध्ये ते बोलत होते त्यावेळी त्यांनी कोरोनाचाही नवा व्हेरिएंट येण्याची भीती व्यक्त केली

डॉ. टेड्रॉस यांनी जगाने नव्या आजारासाठी तयार राहण्याचे आव्हान केला आहे आता जगानं पुढच्या महासाथीसाठी तयार राहायला हवं कोरोनाचाही नवीन धोकादायक व्हेरीयंट येवू शकतो त्यातून आजार आणि मृत्यू वाढण्याची भीती अजून कायम आहे अशा प्रकारची आणखी एक किंबहुना अधिक जीवघेणी महामारी येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही

यानंतर पुन्हा जागतिक महामारी येणार असून त्यासाठी जगानं तयार राहायला हवं असं डॉ. टेड्रॉस परिषदेत म्हणाले

जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चा आकडा 70 लाख मानला जातो मात्र डॉ. टेड्रॉस यांनी या आकडा यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असल्याचे म्हटले आहे किमान 70 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती पण आपल्या सर्वांना ठाऊक आहे की खरा आकडा यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे किमान दोन कोटी इतका हा आकडा आहे असे डॉ. टेड्रॉस म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)