पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार:
‘आयुष्यमान भारत’ आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून राज्यातील बारा कोटी नागरिकांना आता मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार होणारं आहे.
महात्मा फुले योजनेत 950 आजारांचा समावेश होता, तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत 1900 आजारावर उपचार होतात.
त्यामुळे आता केंद्राच्या यादीतील 1900 आजारावर संबंधित रुग्णालयामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार होतील.
आयुष्यमान हेल्थ कार्ड नसेल तरी मिळेल फ्री मध्ये पाच लाखापर्यंत उपचार
सरकारने समाविष्ट हॉस्पिटल ला आदेश दिले आहे की ज्यांच्याकडे आयुष्यमान हेल्थ कार्ड नसेल परंतु ते या योजनेमध्ये पात्र असतील त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा ऑनलाईन पद्धतीने त्यांचे आभा आयडी तयार करून नोंदणी करून घ्यावी जेणेकरून ते आयुष्यमान योजना पासून वंचित राहणार नाही मग त्यांना पाच लाख रुपयांचा मोफत उपचार मिळू शकेल