तलाठी भरती 2023 :- 20 जून पासून तलाठी ची लिंक होणार सुरू

Shweta K
By -
0

मित्रानो, तलाठी भरती ची ऑनलाईन apply ची लिंक दिनांक 20 जून 2023 पासून सुरू करण्याची शासनाने मागणी केली आहे, तलाठी भरती साठी राज्यात युवक युवती आतुरतेने वाट पाहत असून ही लिंक चालू झाल्यास उमेदवार तलाठी भरती साठी apply करता येईल

तलाठी भरतीचा आधी मुहूर्त 15 जून होता परंतु अनुकंपा भरती मुळे अजून काही दिवस भरती लांबणीवर गेली परंतु आता शासन ने 20 जून पासून लिंक सुरू करण्याची मागणी केली आहे

तलाठी भरती

उमेदवारांना भरावा लागेल तब्बल 1000 रुपये परीक्षा फी

तलाठी भरती करिता उमेदवारांना तब्बल 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले असून मागासवर्गीयांना तब्बल 900 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याबाबत असंतोष निर्माण झालेला आहे केंद्र सरकारच्या विविध परीक्षा मध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्क नसते म्हणून बरेच विद्यार्थी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तसे शासनाला मागणी करत आहेत की परीक्षा शुल्क कमी करावे

तलाठी भरती 2023 मधील उपलब्ध पदांचा सविस्तर तपशील खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही बघू शकता

तलाठी भरती जागांचा तपशील पहा

संपूर्ण राज्यात एक प्रश्नपत्रिका असणार तलाठी भरती करिता

तलाठी भरतीची प्रक्रियेसाठी टीसीएस या कंपनीची निवड केली असून टीसीएसने एकच प्रश्नपत्रिका तयार केली असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच प्रश्न पत्रिका राहणार आहे प्रश्न पत्रिका चे स्वरूप हे नेहमी नुसारच असणार आहे तसेच दोनशे गुन्हा करिता शंभर प्रश्न असणार व नकारात्मक गुणधर्म राहणार नाही टीसीएस परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम विभागाने अगोदरच जाहीर केलेला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)