Mansoon Update : महाराष्ट्रात मान्सून येणार या तारखेला हवामान खात्याने दिले महत्त्वाचे अपडेट

Shweta K
By -
0

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्व डोळ्यात तेल घालून मान्सूनची वाट बघत आहात कारण मान्सून आला की पेरणीला आपण सुरुवात करू परंतु अद्याप पर्यंत मान्सून हा महाराष्ट्रात आला नसून तो केरळमध्येच 11 तारखेला पोचला होता परंतु पेपर जॉय या चक्रीवादळाच्या तडाख्यात मानसून भरकटला असून तो अजून काही दिवस आपणास वाट पाहू लावणार आहे

जून महिन्याची 15 तारीख गेली तरीसुद्धा मान्सून अजून पर्यंत राज्यात आलेला नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे मान्सून संदर्भात हवामान विभागाने आज मोठी बातमी दिली आहे पुणे आणि मुंबईमध्ये 18 जून ते 22 जून या तारखेत मान्सूनचा पाऊस येऊ शकतो

18 जून ते 22 जून या काळात पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील अधिक भागात मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती असणार परंतु उत्तर महाराष्ट्र व विदर्भ मध्ये मान्सूनची प्रगती होण्यास वेळ लागू शकतो

18 जून ते 21 जून या कालावधीमध्ये दक्षिण द्विकल्प आणि पूर्व भारत आणि लगतच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून च्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले सांगितले

बीपरजॉय वादळ ठरला मान्सूनला अडथळा

अरबी समुद्रामध्ये आलेले बीपरजॉय वादळ मान्सूनला अडथळा निर्माण करणारे ठरले असून त्यामुळे मान्सून हा लांबणीवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे या चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली पबीपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा गतीवर परिणाम पडला असून जसा जसा चक्रीवादळाचा परिणाम ओसरेल तसा तसा मान्सून सक्रिय होणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)