ZP भरती : जिल्हा परिषदेची जाहिरात येणार जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये IBPS मार्फत होणार परीक्षा

Shweta K
By -
0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अखेर जिल्हा परिषद भरती चा मार्ग आता मोकळा झाला असून भरतीसाठी असणाऱ्या त्रुटी दूर झाल्या आहेत व जुलै च्या पहिल्या आठवड्यात जाहिरात झळकण्याची शक्यता आहे

ZP भरती
ZP भरती

2014 पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता तसेच यामध्ये अनेक बदल झाल्याने शासनाने नवीन अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समितीची नियुक्ती केली होती एकूण 27 वर्गासाठी आता अभ्यास निश्चित करण्यात आला आहे

यामध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता यापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता होती त्यामध्ये बदल करून आता या स्वर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण अशी पात्रता करण्यात आली आहे ज्या सवर्गात तांत्रिक प्रश्न विचारले जाणार त्यांची काठीण्य पातळी समजून घेण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित केला गेला आहे

कोणत्या तारखेला येणार जिल्हा परिषद भरतीची जाहिरात

मित्रांनो जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन जुलै च्या दरम्यान जिल्हा परिषदची भरतीची महाजाहिरात येण्याची तयारी ग्रामीण विकास विभागाने केली आहे

पुणे जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 1008 जागा रिक्त असल्यामुळे भरतीसाठी रिसर्च जाहिरात काढून अर्ज मागविले जाणार राज्यस्तरावर सर्व जिल्हा परिषदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्यामुळे संबंधित परीक्षा ही एका दिवशी एका सवर्गाची असणार आहे

आयबीपीएस मार्फत होणार भरती

जिल्हा परिषदेने परीक्षा पाडण्यासाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती केली आहे पेपरची तपासणी करणे फेर तपासणी करणे पेपर घेणे या सर्व गोष्टी एजन्सी मार्फत होणार आहे

प्रत्येक संवर्गासाठी असणार स्वतंत्र परीक्षा

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा स्वतंत्र दिवशी घेतली जाणार आहे यामध्ये संवर्ग नुसार मराठी इंग्रजी संबंधित प्रश्न सामान्य ज्ञान बुद्धिमापक आणि गणिताचे प्रश्न तसेच तांत्रिक प्रश्न असणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)