नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग भरती ची परीक्षा दिलेले तब्बल आठ लाख विद्यार्थी दोन वर्षापासून परीक्षेची प्रतीक्षा करत आहे यामध्ये गट क व गट ड या पदांसाठी लेखी परीक्षा झाली होती परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने शासनाने परीक्षा रद्द केली व तेव्हापासून ही पदभरती रडखळली आहे त्यामुळे तब्बल आठ लाख विद्यार्थी या भरतीची आतुरतेने वाट बघत आहे
या आरोग्य पदभरती मध्ये गट क च्या तब्बल 2739 जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते तर गट ड च्या तब्बल 3460 पदांकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते व परीक्षा शुल्क भरले होते
अखेर 20 महिन्यापासून रडखळलेली भरती येत्या महिन्याभरात नियोजन करून परीक्षा घेण्याचे ठरले आहे अशी बातमी न्युज पेपर मधून बघायला मिळत आहे
सहा हजार दोनशे पाच जागांकरिता तब्बल आठ लाख 60 हजार पेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती परंतु झालेल्या भ्रष्टाचारामुळे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही परीक्षा रद्द केली व तेव्हापासून अद्याप पर्यंत नव्याने परीक्षा घेण्यात आली नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यालाच अनुसरून शिंदे सरकारने महिन्याभरात परीक्षांचे नियोजन करून भरती केली जाईल म्हटले आहे