आरोग्य विभागात 11000 जागांची होणार मेगा भरती लवकरच जाहिरात होणार प्रसिद्ध

Shweta K
By -
0

आरोग्य विभाग भरती 2023 : मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून रुग्णांच्या आरोग्य सेवेवर याचा परिणाम होत आहे म्हणून रिकामी पदे तात्काळ भरण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली असून गट क आणि गट ड ची 11903 पदे पुढील आठवड्यात भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती येत आहे

या पदाच्या जाहिरातीचा मसुदा काय असावा त्याची जाहिरात कशा पद्धतीने करावी यावर सध्या विभागात खलबल सुरू असून जाहिरात लवकर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे रिक्त जागा एमपीएससी राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विस यांच्यामार्फत भरल्या जाणार आहे

या जागा आहेत रिक्त

क संवर्गात परिचारिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य सेवक लिपिक टंकलेखक वाहन चालक या पदांचा समावेश असतो तर गट ड मध्ये शिपाई सफाई कामगार कक्ष सेवक यासारख्या पदांचा समावेश असतो या दोन्ही संवर्गातील मोठ्या संख्येने पदे रिक्त आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)