एफ डी न करता बचत खात्यात मिळेल आता एफ डी चे व्याज त्यासाठी करावे लागेल हे काम

Shweta K
By -
0

जर तुमच्या बचत खात्यात अधिक पैसे असतील आणि आपल्याला त्यावर अधिक व्याज मिळत नसेल तर अशा स्थितीमध्ये ऑटो स्वीप सुविधा सुरू करणे गरजेचे आहे काय आहे ऑटोस्वीप सुविधा जाणून घेऊया आजच्या या लेख मध्ये

ऑटो स्विप म्हणजे काय

ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध आहे जर एखाद्या बचत घातक खातेधारकाने त्याच्या बचत खात्यात ऑटो स्विप सुविधा सुरू केली तर एफडीची सुविधा म्हणजेच मुदत ठेव देखील खात्यातून आपोआप सुरू होते जेव्हा खात्यात पैसे जास्त असतील तेव्हा ते पैसे ग्राहकाच्या नावावर आपोआप एफडी मध्ये रूपांतरित होतात

व त्यावर जास्त व्याज मिळते यामध्ये बचत मर्यादा किती असावी हे ग्राहक ठरवतात एफडी झाल्याची माहिती ग्राहकाच्या मोबाईलवर येते जर कधी खात्यातील पैसे ठरलेल्या मर्यादा पेक्षा कमी झाले तर पैसे आपोआप एफडी मधून बचत खात्यात परत येतात अशा प्रकारे ग्राहकाला एकाच खात्यावर बचत खाते आणि एफडी दोन्हीचा लाभ मिळतो

ऑटोस्वीप चे फायदे कोणते आहे

सर्वसाधारणपणे बचत खात्यावर केवळ तीन ते चार टक्के वार्षिक व्याज मिळते मात्र एफडी वर सहा ते आठ टक्के व्याज मिळते अशा परिस्थितीत ऑटोस्वीप सुविधा घेतल्यास बचतीच्या पैशातून तुम्हाला एफडी द्वारे चांगला परतावा मिळू शकतो जेव्हा तुम्ही एफडी कराल तेव्हा त्या ठराविक कालावधीसाठी व्याज जमा करावे लागते एफडी मध्ये मध्येच बंद केली तर नुकसान होते पण बचत खात्यात ही एफडी जोडल्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही बंधनात राहत नाही तुमचे पैसे साधारणपणे कधीही कोणत्याही प्रक्रिये शिवाय काढता येते

ऑटो स्विप सुविधा घेण्यासाठी काय कराल

ऑटो स्विप सुविधेला बँक खात्याशी जोडण्याकरिता आपल्याला आपलं बचत खाता एफ डी खात्याशी लिंक करावा लागेल यात तुम्हाला स्वतःची बचत खात्याची मर्यादा निश्चित करावी लागेल तसेच तुम्हाला बँकेला सांगावे लागेल की खात्यात किती रक्कम ठेवायची आणि उरलेले पैसे एफडी खात्यात हस्तांतरित केले जावे ही सुविधा ऑनलाईन किंवा बँकेला भेट देऊन तुम्ही सुरू करू शकता

कोणत्या बँकेत मिळेल ऑटो स्विप सुविधा

ऑटोस्वीप सुविधा ही सर्वच बँकेमध्ये सुरू आहे तुमचे ज्या बँकेमध्ये खाते असेल तर ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन ही सुविधा घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला बँकेला भेट द्यावी लागेल किंवा तुमचं ऑनलाईन बँकिंग असेल तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ही सुविधा घरी बसून चालू करू शकता

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)