E Ration Card : सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार असून त्या ऐवजी ऑनलाइन पद्धतीचे इ रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिले जाणार आहे
इ रेशन कार्ड मधून बरेचशे कामे घरी बसूनच करता येणार आहे त्यामध्ये नाव नोंदविणे ,नाव कमी करणे ,राशन कार्ड ट्रान्सफर करणे ही कामे ऑनलाईन एका झटक्यात होईल
पुढील काही महिन्यात मध्येच सध्यात अस्तित्वात असलेलं राशन कार्ड टप्प्याटप्प्याने इ कार्ड मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे
राज्य शासनाने ई राशन कार्ड देण्याबाबतचा निर्णय घेतला होता त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे
qr कोड असलेल्या ऑनलाईन राशन कार्ड देण्यात येणाऱ्या या प्रणालीमुळे नागरिकांना नवीन राशन कार्ड साठी अर्ज करणे पत्ता बदलणे नावात दुरुस्ती करणे तसेच नवीन नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे ही कामे आता ऑनलाईन घरबसल्या करता येणार आहे
ऑनलाइन इ रेशन कार्ड मुळे जुने फाटलेले मळकट रेशन कार्ड पासून नागरिकांची आता सुटका होणार असून जेव्हा नागरिकाला राशन कार्ड ची गरज पडेल तेव्हा तो ऑनलाइन digi लॉकर मध्ये सुद्धा बघू शकेल
इ रेशन कार्ड चे फायदे
इ रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांची कार्यालयात होणारी पायपीट व त्रास थांबेल
मेल मोबाईल फोन द्वारे पीडीएफ फोटो स्वरूपात हे राशन कार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होईल
जुने फाटलेले मळकट राशन कार्ड पासून नागरिकांची सुटका होणार
हे राशन कार्ड नागरिकांना कुठेही डाऊनलोड करता येईल व कोणत्या शासकीय कामासाठी किंवा रेशन घेण्यासाठी कार्ड घेऊन जाण्याची गरज सुद्धा राहणार नाही