01 तारखेपासून हे नियम बदलणार

Shweta K
By -
0

सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत पैशाशी संबंधित अनेक नियम 1 ऑक्टोबर पासून बदलणार आहेत याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे त्यासाठी या नियमाची माहिती असणे महत्त्वाचे आहे हे नियम माहित नसेल तर तुम्हाला समोर अडचणीचा सामना करावा लागू शकतो

दोन हजार रुपय ची नोट बदलून घ्या

रिझर्व बँकेने सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयाची नोट बदलण्याची मुदत दिली आहे त्यानंतर या नोटा चालणार नाहीत त्यामुळे दोन हजार रुपयाची नोट नक्कीच बदलून घ्या

बचत खात्यासाठी लागेल आधार

आता छोट्या बचत योजनांमध्ये आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे पीपीएफ सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादी मध्ये आधार ची माहिती देणे आता आवश्यक असणार आहे असे न केल्यास एक ऑक्टोबर 2023 पासून ही खाती गोठवली जाणार आहेत

डिमॅट अकाउंट खातं होईल फ्रिज

सेबीने डिमॅट अकाउंट व ट्रेडिंग खात्यामध्ये नॉमिनेशन अनिवार्य केले आहे त्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर 2023 रोजी संपणार आहे या तारखेपर्यंत कोणत्याही खातेदाराने नॉमिनेशन केले नसेल तर हे खाते एक ऑक्टोंबर पासून फ्रिज होणार आहे अशा परिस्थितीत तुम्ही डिमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही म्हणून त्यापूर्वीच नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)