हायपर ऍसिडिटी : ऍसिडिटी किंवा हायपर ऍसिडिटी ने सामान्यतः प्रत्येक दुसरा व्यक्ती बाधित आहे पचन क्रिया बिघडल्यावर पोटात आम्लता किंवा पित्त वाढल्याने ही समस्या उद्भवण्यास सुरुवात होते पोटात गॅस होणे पोट फुगणे पार्श्वभागातून गॅस पास होताना आवाज होणे पोटासह संपूर्ण शरीर दुखणे छातीमध्ये कळ येणे सतत दुखणे, हृदय गात होत असल्याचा भास होणे ढेकर येणे तोंडाला वास येणे डोकेदुखी हे त्रास या समस्येमध्ये सुरू होतात
तेलकट जास्त मसालेदार जेवण पाणी कमी पिणे फास्ट फूड खाणे मद्यपान करणे धूम्रपान करणे त्यामुळे ही समस्या उद्भवते जर हायपर ऍसिडिटी दीर्घकाळ असेल तर त्यामुळे गॅस्ट्रो धोका संभवतो एवढेच नव्हे तर दीर्घकालीन ऍसिडिटी मुळे शरीरातील अन्य यंत्रणेत बिघाड व्हायला सुद्धा सुरुवात होते आणि फंगल इन्फेक्शन ,सायरोसिस, लिव्हर सायरोसिस, डोक्यावरील केस गळती , डोळ्यांवर ताण आणि सर्वात भयंकर म्हणजे अण्ण नलीकेतील कर्करोगाचा सामना करण्याचा धोका निर्माण होतो एकंदर हायपर ऍसिडिटी मुळे आयुष्याची फजिती होते
हायपर ऍसिडिटी ची लक्षणे कोणती
अन्ननलिकेमध्ये वेदना होणे जळजळ वाटणे
पोटातील गॅस रिव्हर्स झाल्याने येसोफेगस च्या माध्यमातून अन्न तोंडात आल्यासारखे वाटणे
कडू किंवा आंबट ढेकर येणे
शरीर जड वाटणे
गॅसचा त्रास
पोटामध्ये वेदना
तोंडाला चव नसणे
पाठ व मान दुखणे
पोट साफ न होणे
फंगल इन्फेक्शन होणे
डोळ्यांमध्ये जळजळ
तोंडात आंबट पाणी येणे
अस्वस्थता वाटणे
कायम थकवा जाणवणे
जेवण पचन न होणे
हायपर ऍसिडिटी ची कारणे
- अवेळी जेवण करणे
- धूम्रपान करणे
- मद्यपान करणे
- व्यायाम न करणे
- फास्ट फूड चे सेवन करणे
- जास्त वेळ जागरण करणे
- झोप कमी घेणे
ऍसिडिटी चे प्रकार कोणते
ऍसिडिटी चे सुद्धा प्रकार असतात ऍसिडिटी चे खालील प्रकार पडतात
वातासोबत असणारी ऍसिडिटी
वात कफा सोबत असणारी ऍसिडिटी
कफा सोबत असणारी ऍसिडिटी
अशा ऍसिडिटीची चिकित्सा सुद्धा त्याच अनुषंगाने करणे आवश्यक असते तर ऍसिडिटी मुळासकट संपते अन्यथा ती वारंवार होत राहते पित्त दूषित झाले पित्ताचे परी वर्तन होणे विविध जसे उष्ण गुण शीत गाढ पातळ विश् युक्त झाले तर त्या सगळ्यांच्या अनु षंगाचा उपचार मध्ये विचार करावा लागतो
ऍसिडिटी कडे दुर्लक्ष करत गेल्याने ही व्याधी गंभीर स्वरूप धारण करू शकते व अन्न आजारांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते बहुदा आजकाल ऑटो-इमुन डिसऑर्डर म्हणजे ऍसिडिटी आहे एवढेच नव्हे तर ऍसिडिटी अन्ननलिकेच्या कर्करोगासही कारणीभूत ठरू शकते शिवाय दीर्घकालीन ऍसिडिटीमुळे सर्वाइकल स्पॉंडिलिसीस पाठदुखी कंबरदुखी आधी समस्या येऊ शकतात ऍसिडिटी ला सामान्य न समजता आधीच सोपे व सहज असे आयुर्वेदिक उपचार करणे कधी चांगले ठरते
हायपर ऍसिडिटी मुळे फंगल इन्फेक्शन चा धोका
रात्री बे रात्री जागरण आणि तणावामुळे सुरुवातीला ऍसिडिटीचा प्रभाव सुरू होत असतो सामान्य म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो मात्र हळूहळू जसजसे दिवस महिने किंवा वर्ष जातात तसेच असे त्याचे परिणाम त्वचेवर दिसून यायला लागतात यालाच फंगल इन्फेक्शन अशी म्हटले जाते तळहात तळपाय असेही इन्फेक्शन सुरू होत असते हळूहळू हात पाय आणि मग सर्वाधिक आत राहणाऱ्या जागेवरच म्हणजे काखेत जांघेत याचा प्रादुर्भाव होतो एकीकडे हायपर ऍसिडिटीचा जोर असतो तर दुसरीकडे त्वचा विकारही वाढायला लागतो त्याचे पर्याय पुढे म्हणून सोरायसिस होत जाते म्हणून प्रारंभिक ऍसिडिटी कडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते