स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात आपत्ती म्हणजे काय आणि या जोखमीची माहिती देण्यासाठी करावयाची कार्यवाही
स्थानिक आपत्ती
या अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जन्म झाल्यास भूस्खलन गारपीट ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते
या जोखीम अंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढवून किंवा उसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून हे दीर्घकाळ जन्म राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत असेल तर लागू राहील परंतु सदरची जल पिकांना जसे भात पिकांना लागू राहणार नाही
काढणीपश्चात नुकसान भरपाई निश्चित करणे
ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंड्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी काढणीनंतर चुकवण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्याचे आत म्हणजेच 14 दिवस गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निष्कांच्या अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल
पीक नुकसानाची माहिती कळवण्याची पद्धत
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास घटनेच्या 72 तासाच्या आत थेट विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे आपण खालील नमूद केलेल्या विविध पद्धतीने सूचना देऊ शकता
1. PMFBY पीक विमा अँप वर
2. टोल फ्री क्रमांक वर
3. तक्रारीची लेखी अर्ज कृषी विभाग पिक विमा सुविधा केंद्र किंवा बँकेमध्ये शेतकऱ्याचे नाव मोबाईल क्रमांक अधिसूचित मंडळ बँकेचे नाव आपत्ती प्रकार बाधित्विक इत्यादी ची माहिती असायला हवी
पीक नुकसानाची माहिती कळवताना कोणती काळजी घ्यावी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक स्थानिक आपत्ती किंवा पीक काढणी पश्चात वरती दिल्याप्रमाणे नुकसान असेल तरच तक्रार नोंदवावी अन्यथा तक्रार बाद होते
तक्रार देताना सर्वप्रथम टोल फ्री क्रमांक किंवा पीएम एफ बी वाय क्रॉप इन्शुरन्स ॲप या मार्फत तक्रार देण्यास प्राधान्य द्यावे
तक्रार देण्यासाठी व पीक विमा नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी कोणते शुल्क पैसे आकारले जात नाही त्यामुळे सर्वांनी कोणते आमीशाला बळी पडू नये जर आपणास कोणी पैसे मागत असेल तर तात्काळ कंपनीच्या जिल्ह्यात तालुकास्तरीय प्रतिनिधी किंवा जिल्हा तालुका कृषी कार्यालयात तक्रार द्यावी
पीक नुकसानीचा पंचनामा करता वेळेस आपले कागदी दस्तावेज सोबत ठेवावे
ज्या गट किंवा सर्वे नंबर मधील पिकाचे नुकसान झाले आहे त्याची तक्रार द्यावी