लेक लाडकी योजना

Shweta K
By -
0

लेक लाडकी योजना :

लेक लाडकी योजना

लाभ किती आणि कधी

  • मुलीचा जन्म झाल्यावर : 5 हजार रुपये
  • मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर : 6 हजार रुपये
  • मुलगी सहावीत गेल्यावर: 7 हजार रुपये
  • मुलगी 11 वीत गेल्यावर: 8 हजार रुपये
  • मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर: 75 हजार रुपये

लाभार्थी गट

  • पिवळे व केशरी रेशनकार्डधारक कुटुंब

योजनेची उद्दिष्ट

  • मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे.
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
  • मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे,
  • कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे

उत्पन्नाची अट

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

अटी

  • 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी (एक मुलगा, एक मुलगी) अपत्ये जन्माला आल्यास त्यातील मुलीला ही योजना लागू होईल.
  • जुळ्या अपत्यांपैकी दोन्ही मुली असल्यास दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या मुलांच्या जन्मानंतर पालकांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल..

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)