पद्म पुरस्कार 2024 List

Shweta K
By -
0

पद्म पुरस्कार 2024 List

पद्म पुरस्कार 2024 List

पद्मविभूषण (एकूण : 5)

  1. ➡️माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
  2. ➡️श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
  3. ➡️चिरंजिवी (कला)
  4. ➡️श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
  5. ➡️बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर

पद्मभूषण (एकूण : 17)

  • महाराष्ट्रातून
  • ➡️1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
  • ➡️2) अश्विनी मेहता (औषधी)
  • ➡️3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
  • ➡️4) राजदत्त (कला)
  • ➡️5) प्यारेलाल शर्मा (कला)
  • ➡️6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

पद्मश्री (एकूण : 110)

  • महाराष्ट्रातून
  • ➡️1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
  • ➡️2) मनोहर डोळे (औषधी)
  • ➡️3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
  • ➡️4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
  • ➡️5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
  • ➡️6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)

➡️सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे सह सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

🚩बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.

🚩क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय  मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून . जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी  उदय देशपांडे यांनी  अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे .
50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली.

🚩वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक  वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.

🚩साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर  काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

🚩वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

🚩व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)