vayoshri yojana form pdf download

Shweta K
By -
0

 vayoshri yojana form pdf download

मुख्यमंत्री वयोश्री योजना

योजनेचे उद्देश :

65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरीकांना त्यांच्या दैंनदिन जिवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणे करीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास शासन निर्णय जेष्ठना 2022 /प्र.क्र. 344/600 दिं 06 फेब्रुवारी 2024 शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

65 वर्ष वय असणा-या जेष्ठ नागरीकांकरीता आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करण्याकरीता एकरकमी रुपये 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात जमा करण्यात येईल.

 

योजनेचे अटी :

  1. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती, जेष्ठ नागरीक यांची दिनांक 31/12/2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असावी.
  2. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे (जेष्ठ नागरिक) त्यांचे कडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्ड साठी अर्ज केला असावा. आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
  3. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल राशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजनअंतर्गत वृध्यापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा सादर करण्यात यावा.
  4. लाभार्थ्यांचे कौटुबिंक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. याबाबत लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थ्यांनी मतदान कार्ड सोबत जोडावे
  6. राष्ट्रीयकृत बॅकेंची बॅक पासबुक झेरॉक्स प्रत सादर करावे.
  7. पासपोर्ट आकाराचे दोन फोटा
  8. स्वंयघोषणापत्र
  9. शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे

योजनेचे स्वरुप:

सदर योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थंता/दुर्बतेनुसार सहाय्यक भुत साधने/उपकरणे खरेदी करता येईल.

उदा.

  • चष्मा
  • श्रवण यंत्र
  • ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नि-ब्रेस
  • लंबर बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर इ.

• अर्ज करा •

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर

 

 vayoshri yojana form pdf download - Link

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)